भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील रायझिंग स्टार इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना भावी जीवनात उपयोगी पडणारे व्यावहारिक ज्ञान आत्मसात होण्यासाठी बालआनंद मेळावा भरविण्यात आला होता. 

यामध्ये मुलांनी खाऊगल्लीमध्ये खाण्याचे स्टॉल, पालेभाज्या स्टॉल, गेम स्टॉल लावले होते. त्यामुळे मुलांना गणितालील नफा,तोटा, बेरीज, वजाबाकी, वजनमापे यांचे ज्ञान झाले. तसेच आत्मविश्वास भांडवली ज्ञानवृद्धी,स्वावलंबन आनंद उत्साह या व्यतिमहत्व विकासाच्या गुणाला वाव मिळाला. मेळाव्याचे उद्धाटन उपस्थित पालक तसेच शाळा व्यवस्थापन हरीश धायगुडे, मुख्याध्यापक  बावकर मॅडम, भाग्या जैन मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकवृंध्दानी परिश्रम घेतले. मेळाव्यासाठी भूम तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला,पुरुष उपस्थित होते. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होतो.

 
Top