धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे पंतू तथा संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे नातू श्री गौरव गावडे यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय असून या महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्याकडून झालेला आहे.यापुढे देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करून विकास साध्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित गुरुदेव कार्यकर्त्यांनी केले. याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री गौरव गावडे यांचा सत्कार केला. भविष्यात सुरू करण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी यावेळी मांडला.

या कार्यक्रमाचे आभार डॉ.वैभव आगळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

 
Top