मुरुम ( प्रतिनीधी)- आज सर्वच क्षेत्रात मूली आघाडीवर आहेत भावी काळात हा देश मुलीच चालवतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.विद्यार्थ्यानी सकारात्मक राहून प्रसन्न व आनंदी चेहऱ्याने हसत समस्यांना सामोरे जावे व सातत्यपूर्ण परिश्रमातून यश मिळवावे असे आवाहन आदर्श महाविद्यालयाचे डॉ. दिलीप गरुड यांनी व्यक्त केले.
मायक्रोकॉम कॉम्प्युटर एज्युकेशन या संस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, कौन बनेगा करोडपती फेम मुकुंद मोरे, संजय बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे म्हणाले की, उच्च ध्येय बाळगून ध्येय प्राप्तीसाठी मेहनत, सातत्य, वेळेचे नियोजन, सकारात्मक विचार व दुरदृष्टी ठेवून मूल्ला सरांनी नोकरीच्या मागे न लागता उमरगा येथे सगणंक शिक्षणाची सोय करून हजारो विद्यार्थी घडविले, सोबतच या समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाण ठेवून, स्वतःच्या यशात मशगूल न रहाता अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला रोटरीच्या माध्यमातून त्यांनी वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणीक मदत , करोना काळात शेकडो रुग्णांना अन्नदान अशा सामाजिक उपक्रमातून त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून विद्यार्थ्यानी भावी आयुष्यात वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी यावेळीकेले.
कौन बनेगा करोडपतीच्या हॉटशिट पर्यंत जाऊन यश मिळविलेले जगदाळवाडी येथील शेतकरी मुकुंद मोरे व संजय बिराजदार यांची भाषणे झाली. यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पुजा वाले, सुमय्या जमादार व रमेजा मोमीन यांचा संस्थेतील उत्कृष्ठ योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. मायक्रोकॉम संस्थेच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहीत्याचे वाटप करण्यात आले. पुजा माने यांनी सुत्रसंचलन केले. तर सुमय्या जमादार यांनी आभार मानले. इरफान मुल्ला, माजीद बागवान, ओंकार इसराजी, अस्लम मुल्ला, रऊफ मुरशद यांनी यासाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.