तुळजापूर (प्रतिनिधी) -  तालुक्यातील कामठा, कात्री शिवारात शेतकऱ्यांचा शेतातील गाईचे वासरांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी पहाटे व राञी घडली. त्यानंतर कामठा व कात्री शिवारात शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे. 

या बाबतीत अधिक माहीती अशीकी, आपसिंगा गावापुढे तळ्याजवळ  कामठा शिवारात लक्षमन सांळुके  यांची शेती आहे. त्यांच्या शेता शेजारी जंगल आहे. त्यांनी शेतात दोन वर्षाचे गाईचे वासरु बांधले असता जंगलवातुन बिबट्या मंगळवारी पहाटे येवुन पाठीमागील बाजूने वासरावर हल्ला करुन पाठीमागील भागाचा फडशा पाडला. सदर घटना मंगळवार पहाटे उघडकीस आली. रात्री कात्री शिवारात सचिन देशमुख यांच्या शेतातील  दोन वर्षीय वासराचा बिबट्याने रात्री साडेआठ वाजण्याचा दरम्यान फडशा पाडला. सदरील परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने यात हिस्ञ प्राण्यांचा वावर असल्याची शक्यता आहे. वनविभाग अधिकारीनी घटनास्थळी जावुन पाहणी करुन पंचनामा केला. ग्रामीण भागातील जनतेने शेतशिवारात फिरताना दक्षता घ्यावी असे आवाहन केले.


रात्रीच्या शेती कामांवर परिणाम 

बिबट्या आगमन पार्श्वभूमीवार आधीच ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या भितीत आणखी वाढ होवुन शेतकरी शेतात जावुन रा कामे करण्यासाठी काकु करीत आहे.

 
Top