भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील मुख्य चौकामध्ये चारी बाजूने दिसणार असे भव्य पंधरा ते वीस फुटी बॅनरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोशिवाय इतर मंत्री महोदयांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या आगळ्यावेगळ्या बॅनरने भूम तालुक्यातील लोकांना विचार करण्यास भाग पाडल्यासारखेच केले असल्याने लोकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले असताना मात्र याबाबत भाजपाच्या कार्यकर्त्या अधिकाऱ्याकडून प्रिंट मिस्टेक असल्याचे बोलले जात आहे. मात्र या भव्य अशा बॅनरवर मुख्यमंत्री यांना डावलण्यात आले असल्याचे सध्यातरी लावलेल्या बॅनरवर दिसत आहे. ही बाब दिसत असताना सुद्धा बॅनर बदलले नसल्याने लोकांमध्ये चर्चेला उधाण आला आहे. यामागे नेमकं काय हे अद्याप स्पष्ट न झाल्याने राजकारणात वेगळे पण दिसणार का असंही बोलले जात आहे.