धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हयातून केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला सुरत-चेन्नई ग्रीन कॉरीडॉर हा महत्वाचा महामार्ग आहे. सदर महामार्ग सुरत -चेन्नई असा असून हा महामार्ग धाराशिव जिल्हयातून जात आहे. धाराशिव शहरापासून साधारणत: 35 किमी अंतरावर वैराग ता. बार्शी जि. सोलापूर येथे या महामार्गास केनक्टीवीटी देणेबाबत अनेक दिवसापासून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाठपुरावा रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केला होता. त्यामुळे गडकरी यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघातील वैराग शहराच्या स्पर कनेक्टीवीटीमुळे धाराशिव शहर या महामार्गाशी जोडले जाणार आहे.

स्पर रोड कनेक्टीवीटीची मागणी लोकसभेच्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये जिल्हयातील विविध महामार्गाच्या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारुन धाराशिव जिल्हयातून जाणारा सुरत -चेन्नई महामार्गास स्पर रोड कनेक्टीवीटी मंजुर करण्याची मागणी केली होती. यावर गडकरी यांनी सुरत-चेन्नई महामार्गास स्पर रोड लवकरच मंजूर करण्यात येईल असे सांगितले आहे अशी माहिती माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. 

 
Top