भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मौजे मात्रेवाडी (ता. भूम) येथे आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 4.15 वाजता . विजय सोमनाथ माने या शेतकऱ्यावर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांना तातडीने भूम येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीच्या स्थितीची गंभीरता पाहता त्यांना पुढील उपचारासाठी बार्थी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे.

ही घटना तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण करणारी असून वनविभागाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली जाणे गरजेचे आहे. तरी शेतकऱ्यांनी रात्री किंवा पहाटे जाण्याचं आवश्यक नसल्यास टाळावे आपल्या जीवापुढे जास्त महत्त्वाचं नाहीये हे सर्व शेतकऱ्यांनी पहावे.

.विजय माने यांचे सागर माने बंधू सैनिक हे तिथेच जवळच असल्याने हे दोघेही शेतात रात्रीची लाईट असल्याने पाणी देण्यासाठी गेलेले होते .बिबट्याने तीन वेळेस विजय माने यांच्यावर हल्ला केला. विजय माने हे ओरडल्याने सागर माने त्यांच्याकडे धावत गेल्याने व बॅटरी चमकवल्याने बिबट्या तिथून निघून गेला. त्यामुळे विजय माने त्यांचा जीव वाचला. 


वासराला फाडले

भूम शहराजवळील एमआयडीसी समोरील ओम पिसाळ यांच्या जनावराच्या गोठामधील लहान वासराला खाण्याचा प्रयत्न बिबट्याने केला आहे. मागील दहा-पंधरा दिवसापासून भूम तालुक्यासह शहराजवळ बिबट्या वावरत व दिसत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्या भूम शहरालगत एमआयडीसी समोर भावषेद बुवा जवळ ओम पिसाळ यांचा जनावराचा गोठा आहे. रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान त्या गोठ्यामधील लहान वासराला ईजा करून त्याला खाण्याचा प्रयत्न बिबट्याकडून केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तरी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top