कळंब (प्रतिनिधी) कळंब येथे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परभणी येथे झालेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जातीवादी विकृतीने केलेल्या अमानुष कृत्तीबद्दल जाहीर निषेधाचे निवेदन लोकजनशक्ती पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गटाच्या) वतीने देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, परभणी येथे झालेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ संविधान शिल्पाची तोडफोड जातीवादी प्रवृतीने केलेली असल्याने सदरील कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाजवळ एका व्यक्तीने संविधानाच्या शिल्प प्रतीची विटंबना केली. त्याबद्दल अशा नराधमाला कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. संविधानाबद्दल अशा पद्धतीने अवमान करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या ठिकाणी पुतळे आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात यावी.अशी मागणी लोक जनशक्ती पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गटाच्या) वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या वेळी लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, जिल्हा निरीक्षक निवृत्ती हौसलमल, तालुका अध्यक्ष सुशील वाघमारे, देविदास कांबळे ,भारत कदम ,गौतम हजारे, मुकेश गायकवाड, नागेश धिरे, प्रभू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब टोपे, मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत पाटुळे यावेळी उपस्थित होते.