तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मंदीरातील उपदेवता असलेल्या श्रीदत्त मंदीरात शनिवार दि.14 डिसेंबर रोजी श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीदत्त जयंतीनिमित्ताने शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी श्रीदत्त मुर्तीस अभिषेक करण्यात आल्यानंतर श्रीदत्त मुर्तीस वस्ञोलंकार घालण्यात आले. दुपारी 12 वाजता पारंपरिक पध्दतीने श्रीदत्त मंदीरात विधीवत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी श्री तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत महंत वाकोजी बुवा, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक मंदिरे संस्थान दुर्गेश छत्रे, सुदर्शन पवार, गणेश हंगरगेकर,महेश अंदुरकर, संकेत साळुंखे, सागर इंगळे, राजेश अंबुलगे, रोहन गाडे, चेतन शिंदे, लल्ला काळे, अक्षय चंदनशिवे आदीसह सर्व भाविक भक्त उपस्थित होते.