धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील बालरोग तज्ञ यांची भारतीय बालरोगतज्ञ संघटना शाखा धाराशिव (IAP Indian Academy of Pediatrics) ची नूतन कार्यकारणी धाराशिव येथे नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ दत्तात्रय खुणे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून डॉ प्रसाद धर्म व डॉ प्रशांत मोरे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे सचिव म्हणून डॉ नितीन भोसले यांची निवड करण्यात आली. सहसचिव डॉ अभिजित लोंढे,कोषाध्यक्ष डॉ आमेर खान, महिला प्रतिनिधी डॉ आरती डंबळ, कार्यकारी सदस्य मंडळ डॉ मुकुंद माने, डॉ सचिन रामढवे, डॉ मकरंद बाराते, डॉ नचिकेत इनामदार व डॉ आमलेश्वर गारठे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच संघटनेचे जेष्ठ सदस्य डॉ अभय शहापूरकर डॉ वाघमोडे डॉ थिटे डॉ लोंढे यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.