तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील श्रीतुळजाभवानी तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अंतर्गत आदी माया आदिशक्ती मातंगी मंदिर जीर्णोद्धार कामास शुक्रवार दि. 20 डिसेंबर रोजी आरंभ करण्यात आला. या जिर्णाध्दार कामानंतर आदिमाय अदिशक्ती मंदीर पुरातन रुपात येणार आहे.

आदिमाया आदिशक्ती मंदिराचं कायापलट व पुरातन लुक देण्याचे काम सुरू झाले आहे. मुख्य मुळ मंदीर गर्भगृहासह जैसे थे ठेवले जाणार असुन नव्याने केलेली कामे काढून या मंदीराचा जिर्णोध्दार केला जाणार आहे. गरज पडली शिखर काम करण्याचे नियोजन असल्याचे बोलले जाते. या काम शुभारंभ प्रसंगी  मा. नगरसेवक औदुंबर कदम व सर्व अदिमाय अदिशक्ति मातंगी पुजारी वर्ग उपस्थित होते. हे काम  साई प्रेम कंट्रक्शन लातूर कंपनी करीत आहे.


 
Top