उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सहाय्यक प्रशिक्षणार्थी यांनी एकत्र येत संघटनेतर्फे रविवार (दि.15) निवेदन देत कार्यकाळ वाढवून द्यावा या मागणीचे निवेदन उमरगा तालुक्याचे माझी आमदार ज्ञानराज चौगुले याना देण्यात आले.
चौगुले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हणले आहे की, आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहोत.आणि आम्ही प्रशिक्षण जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.परंतु आम्ही सहा महिन्यानंतर करणार काय ? आम्हाला कायम स्वरुपी रोजगार मिळावा यासाठी कार्यकाळ वाढविण्यात यावा.आम्ही ग्रामीण किंवा शहरी भागात काम करत असताना आम्ही त्या अस्थपणामधील संपूर्ण अनुभव घेत आहोत. आम्ही पुढें काम करत राहावे अशी विनंती सरकार व प्रशासनापुढे आहे. अनुभव पूर्ण होण्यास आमचा कार्यकाळ वाढवावा, सर्व अस्थपनामधील युवकांचे मानधन वाढवावे, महिन्याचा एक तारखेला मानधन मिळावे यासाठी शासनाने आणि प्रशासनाने दखल घेण्याची विनंती निवेदनात केली आहे. यावेळी चौगुले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन यावेळी प्रशिक्षणार्थी यांना दिले. यावेळी उमरगा तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.