उमरगा (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या वतीने कुष्ठरोगाचा प्रसार शुन्यावर आणण्याच्या उद्दिष्टानुसार आरोग्य विभागाकडून भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना परिसरात शुक्रवारी (दि.13) कामगार व मजूरांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. यावेळी अवैद्यकिय पर्यवेक्षक ए.व्ही.शेळके, कुष्ठ रोगतंत्रज्ञ व्ही.पी.फुलगाले,आरोग्य सहाय्यक एल.जी.थोरात आदींची उपस्थिती होती.
कुष्ठारोग मुक्त मोहिमेअंतर्गत विटभट्ट्या,खडी केंद्र,ऊसतोड मजूर,कारखाना कामगार,हॉटेल कामगार यांची तपासणी करण्यात येत आहे.अभियाना अंतर्गत कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक संचालक डॉ.मारुती कोरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमाकांत बिराजदार, वैद्यकीय अधिकारी डॉ ऋतुजा साळुंके यांनी केले आहे.कुष्ठरोगाची लक्षणे म्हणजे अंगावर फिकट पांढरे, लालसर,न खाजणारे,नदुखणारे बधिर चट्टे असणे, हातापायाला मुंग्या येणे,मज्जा जाड दुखर्या असणे,तळ हात,तळ पायांना बधिरता येणे,भुवयाचे केस विरळ होणे.
कानाच्या पाळ्या जाड होणे,चेहरा तेलकट,चकाकणारा दिसणे, अशी लक्षणे आढळून आल्यास शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी. दवाखान्यात तपासणी व उपचार मोफत उपलब्ध आहे लवकर निदान व नियमित बहुविध औषधोपचाराने कुष्ठरोग निश्चित बरा होत असल्याने या करिता आरोग्य सेवक सूर्यकांत घंटे,अजिंक्य कांबळे,किरण जाधव,रवी ढोणे,दिनकर घोटमाळे,आदी परिश्रम घेत आहेत.