धाराशिव (प्रतिनिधी)-मुस्लीम समाजाच्या पाच टक्के आरक्षणाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखविला असून लवकरच हे आरक्षण घोषीत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक खलील पठाण यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव खलील पठाण यांनी नागपूर येथे नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभ सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण या चालू हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करून घ्यावे अशा विनंतीचे निवेदन दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवेदनाचे सर्वांसमोर वाचन करून खलील पठाण यांना आश्वासित केले की, महायुती सरकारच्या काळात या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. हा प्रश्न आपण स्वतः लक्ष घालून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.