धाराशिव (प्रतिनिधी)- मौजे खेड येथील लालबहादूर शास्त्री उच्च व माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या 35 व्या वर्षानिमित्त संविधान व अंधश्रद्धा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव विमानतळ खेड, किणी रस्त्यालगत परिसरात भानामती, करणी सारखा प्रकार आढळुन आल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या टिमने पोलिस प्रशासनसह तिथे भेट देऊन नागरिकांना अंधश्रद्धेचा प्रकार आहे असे सांगितले. त्याला स्मरुनच अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने खेड येथील लालबहादूर शास्त्री उच्च व माध्यमिक विद्यालयात अंधश्रद्धा जादुटोणा विरोधी चमत्कार व विज्ञान हा कार्यक्रम घेऊन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड.अजय वाघाळे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मुलन चमत्कारा मागील विज्ञान व जादुटोणा प्रतिबंधक कायदा सांगण्याचा प्रयत्न केला. तर तस्लीम काझी यांनी केलेल्या प्रात्यक्षिक प्रयोगाचे विश्लेषण सांगितले. भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती करण्यात येत असुन कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक वाचुन करण्यात आली. आलेल्या यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. अजय वाघाळे, स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव, अब्दुल लतिफ,सिध्देश्वर बेलुरे, गणेश वाघमारे, बलभीम कांबळे, तस्लीम काझी, युसुफ सय्यद,रोहिदास भिसे, श्रीमती आर. ए. शेख, शिंदे मॅडम, शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी अन्य इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माने यांचे केले. तर आभार शाळेचे मुख्याध्यापक एस एस लोमटे यांनी मानले.