तेर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा तेर येथील शैक्षणिक सहल 2024-25 मुलींच्या भावविश्वात ऐतिहासिक गडकिल्ले,राजवाडा,धार्मिक स्थळे,कोकण किनारपट्टीवरील उंच नारळाची झाडी ,अथांग निळाशार समुद्रातील लाटात मनसोक्त डुंबून,मावळतीच्या तांबूस प्रकाशात कर्ली नदीच्या जलाशयातून बोटीने प्रवास करत देवबाग त्सुनामी बेट,ऑस्ट्रेलियन सिगल पक्ष्यांचा थवा अशा अनेक सुंदर अविस्मरणीय अनुभवाची कुपी,स्वावलंबन,सहकार्य मैत्री अशा संस्काराची शिदोरी घेऊन विद्यार्थीनी मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहलप्रमुख सुशिल क्षीरसागर नेतृत्वात मालोजी वाघमारे, प्रतिभा जोगदंड, किरण फंड यांच्या उत्कृष्ट नियोजनात सहल संपन्न झाली.