धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत नांदेड येथे घेण्यात आलेल्या सोलापूर विभागीय क्रिकेट स्पर्धेत धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. 

महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या दरवर्षीच्या परंपरेनुसार यावर्षीही छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर विभागीय संघात महाविद्यालयाच्या तब्बल 7 खेळाडूंची निवड झाली. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये फलंदाज म्हणून रोहित चव्हाण, धनराज भडांगे, अष्टपैलू खेळाडू म्हणून जगदीश कुलकर्णी, प्रदीप बनसोडे, गोलंदाज म्हणून जिशान खान व संकेत खांडेकर तर यष्टिरक्षक म्हणून अभिषेक वाघ या खेळाडूंची निवड करण्यात आली.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक विश्वजीत खोचरे यांचे मार्गदर्शन लाभल. विशेष म्हणजे सोलापूर विभागीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा ही विश्वजीत खोचरे यांच्या खांद्यावरती सोपवण्यात आली आहे. गुतवर्षी महाविद्यालयातील 20 पेक्षा अधिक विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली होती.  महाविद्यालयाने सरावासाठी आर्टिफिशल लोन कोर्ट, सर्व सुविधा व प्रशिक्षक उपलब्ध केल्यामुळे आम्ही विजयी होऊ शकलो. अशी प्रतिक्रिया विजयी संघाने व्यक्त केली आहे.

या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी भरपूर महाविद्यालयाने सहभाग घेतला होता. परंतु यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कडवी झुंज देत विजयश्री खेचून आणली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, बाळासाहेब वाघ, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या सर्व यशस्वी खेळाडूंना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख आर.एम.शेख व ए.काझी यांचे महत्वपूर्ण योगदान व मार्गदर्शन लाभले.


 
Top