तुळजापूर (प्रतिनिधी)- दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा ये-जा वाढल्यामुळे तब्बल 941 कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे 31.36 कोटी रुपये उत्पन्न प्रतिदिन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे 26 कोटी रुपयांनी जास्त आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी दिवाळीच्या काळात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा ही भाडेवाढ नसतांना देखील वाढलेले विक्रमी उत्पन्न हे एसटीवर सर्वसामान्य प्रवाशांनी दाखवलेले विश्वासाचे द्योतक आहे. असे प्रतिपादन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.

 
Top