तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील जळकोट येथे काँग्रेस आय पक्षांच्या वतीने ग्रामपंचायत समोर ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “ईव्हीएम हटवा, देश वाचवा“ ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, या मागणीसाठी मंगळवारी दि.17 डिसेंबर रोजी जळकोट येथे ही मोहीम राबवून यापुढे देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर शिक्का मारून घेण्यात याव्यात. यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील, सरपंच गजेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, शंकर वाडीकर, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, जीवन कुंभार, दत्तात्रय चुंगे, यशवंत सुरवसे, अमोल आलुरे, विश्वनाथ कार्ले, विश्वास भोगे,सागर करंडे, सलीम तांबोळी, विश्वनाथ सुरवसे, पांडुरंग गिरी, यशवंत पाटील, समाधान पाटील, उमाकांत माळी, गिरीश नवगिरे, सोसायटीचे माजी चेअरमन राजकुमार पाटील यांच्या सह नागरिकांनी उपस्थित राहुन स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला.

 
Top