धाराशिव (प्रतिनिधी) - येथील नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिवच्या चेअरमनपदी पत संस्थेचे संचालक तथा नगर परिषदेतील वरिष्ठ लिपिक रावसाहेब अंबादास शिंगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

धाराशिव शहरातील समर्थ नगर येथील नगर परिषद सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात या निवडीसाठी दि.12 डिसेंबर रोजी संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये रावसाहेब शिंगाडे यांचे बिनविरोध निवड करण्यात आले, या बैठकीस पतसंस्थेचे संचालक दीपक तावडे, दिगंबर कुलकर्णी, विकास माने, दुय्यम निबंधक कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी एन.टी. रेडेकर, सहाय्यक अमोल सोलंकर, पतसंस्थेचे संचालक तानाजी सुरवसे, सादिक बागवान, सतीश पेठे, संगीता वाळा, महादेव निंबाळकर आधी सह सर्व सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल शिंगाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 
Top