भूम (प्रतिनिधी)-  येथील प्राईड इंग्लिश स्कूल मध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळ्याचे उदघाटन भूम येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री.राधेश्याम सोनटक्के, न्यायाधीश श्रीमती खान मॅडम व'सन्मान बासुंदी' चे सोपान वरवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाग्यश्री डांगे यांनी तर सूत्रसंचलन मेघा सुपेकर यांनी केले.

आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. यामध्ये मसाला पापड, चायनीज भेळ, बालुशाही,पेस्ट्री,पास्ता,चना चाट,पॉपकॉर्न,भेळ, इडली,पाणीपुरी,पावभाजी,  असे एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थ बनवून आणले होते तर काहीं स्टॉल वरच पदार्थ बनवून विक्री करत होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी व उपस्थित पालक व नागरिकांनी घेतला. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यासह पालकाच्या अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा यासाठी आयोजन केलेल्या या कार्यक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. आनंद मेळाव्याच्या आयोजनास मोठा प्रतिसाद मिळाला या वेळी पन्नास हजाराहून अधिक रुपयाची उलाढाल झाली. कार्यक्रमाचे आभार अमर सुपेकर यांनी मानले. हा आनंद मेळा यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे,अरुणा बोत्रे, विश्वजित सुपेकर,गणेश, सुपेकर,अक्षय बाराते, निलेश होरे, अमित सुपेकर, आहेर आदिनी परिश्रम केले.

 
Top