तुळजापूर (प्रतिनिधी)- अभाविप ने घेतलेला मानसशास्ञीय चाचण्या उपक्रम मुळे मला पुढील शिक्षणासाठी योग्य व मार्गदर्शन मिळाल्याचे प्रतिपादन राज्य व राष्ट्रिय पेंटींग मध्ये पुरस्कार विजेते  यांनी केले.

सिध्दार्थ शिंगाडे याने जे. जे. आर्ट मुंबई येथे पेंटींग शिक्षण घेतले. जहागीर आर्ट आँफ गँलरी मुंबई येथे तीन वेळा नागपूर, उज्जेन, बंगलोर, बांगलादेश, दिल्ली, मलेशिया येथे येथे प्रदर्शन भरवुन कार्यशाळेत सहभागी होवुन अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला. याबद्दल त्याचा सत्कार अभाविप माजी उपाध्यक्ष गणेश जळके, लेखक संजय पाचपोर यांचे भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर उवाच हे पुरस्तक देवुन त्याचा सत्कार करुन सन्मान करण्यात आला. यावेळी सत्यवान मुसळे, विजय चव्हाण, शहाजी शिंगाडे, ममता शिंगाडे सह अजिंक्य रेसीडेन्सी तील रहिवासी उपस्थितीत होते.


 
Top