तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजा भवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस

मंगळवारी (31 डिसेंबर) सायंकाळी प्रारंभ झाला. ही मंचकी निद्रा मंगळवार 7 जानेवारी 2025 पर्यत चालणार आहे.

मंगळवार सांयकाळी पुजेचा घाट होवून मुख्य मुर्तीला भाविकांचे पंचामृत अभिषेक घालण्यात आल्यानंतर मुर्ती स्वच्छ करुन चांदीच्या सिंहासनावरील अधिष्ठित 

मुर्ती शयन गृहात चांदीचा पलंगावर निद्रस्त करण्यात आली. नंतर तिथे देवीचे नित्योपचार आरती करण्यात आली. यावेळी महंत, भोपे पुजारी, सेवेकरी, मंदीर अधिकारी, कर्मचारी, मानकरी उपस्थितीत महंत वाकोजी, गुरु तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ पुजा केल्यानंतर मंदीर बंद करण्यात आले.

मातेच्या येत्या सात दिवसाच्या निद्रा काळात मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक बंद राहणार असून मुर्तीला सकाळ-संध्याकाळ सुगंधी तेल लावण्यात येणार आहे. भाविकांना मातेच्या मुर्ती सिंहासनावरून हलविण्यात येवून सिंह गाभाऱ्या नजीकच्या शेजघरातील चांदीच्या मुख व धर्म दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

मंगळवार दि. 7 जानेवारीला पहाटे मुख्य मूर्तीची सिंहासनावर पूर्नप्रतिष्ठापना करण्यात येवून त्याचदिवशी दुपारी बारा वाजता मंदिरातील पिंपळ पारासमोरील गणेश विहार ओवरीमध्ये शाकंभरी देवीच्या प्रतिमेची विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर यजमानांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात घटस्थापनेचा विधी होणार  आहे.

 
Top