तुळजापूर (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महिलांमध्ये आनंदी  वातावरण निर्माण झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या अर्जाची निकषानुसार पुन्हा छाननी होणार असल्याने लाडक्या बहीणींनी मध्ये आपला अर्ज छाननीत रद्द तर होणार नाही ना, यामुळे लाडक्या बहिणी धास्तावुन गेल्या आहेत.

निवडणुकीनंतर अनुदान कधी जमा होणार, अशी एकमेकींत चर्चा सुरू झाली आहे. महायुती सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तुळजापूर तालुक्यात हजारो लाडक्या बहिणींची नोंदणी झाली असून, त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै ते नोव्हेंबर अखेरपर्यंतचा प्रति महिला 1500 रुपयांप्रमाणे प्रत्येकी साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा झाले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये खात्यात जमा करणार, असे आश्वासन दिले होते. लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला काही अटी आणि निकष जाहीर केले होते. त्यानुसार या योजनेंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन असे अर्ज स्वीकारले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या योजनेचे सर्वच अर्ज सरसकट मंजूर करण्यात आले. अर्ज स्वीकारले होते. त्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला. मात्र आता अर्जाची छाननी होणार असल्याने महिलांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळेल की नाही याची हुरहूर लागली आहे. शेतकरी सन्मान योजनेचे हे असेच झाले होते. सरसकट शेतकऱ्यांना प्रथम या योजनाचा लाभ दिला. मात्र त्यानंतर छाणनी केली असता टँक्सधारक शेतकरी वगळले व ज्यांना पैसे मिळाले होते ते नोटीस पाठवुन परत घेतले. 

 
Top