धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी (रहे), यांचा उर्स 15 जानेवारी पासून साजरा होणार आहे. या उर्सा दरम्यान जी प्रमुख संदल मिरवणूक निघतात त्यामध्ये व दुसऱ्या दिवसापासून दहा दिवस चालणाऱ्या कुठल्याही कार्यक्रम किंवा मिरवणुकीत कसल्याही प्रकारच्या डॉल्बी वाद्य वाजविण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी शहरातील मुस्लिम समाजातील नगरिकांनी पोलिसात केली आहे डीजे डॉल्बी च्या वाद्यामुळे मानवी शरीरावर खूप मोठे परिणाम होतात त्यामुळे हे वाद्य वाजवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
पठाण मोईनोद्दीन , खलील सैफ सय्यद , मसूद शेख, बिलाल तांबोळी, खलील उर्फ खलिफा कुरेशी, खादरखाॉ पठाण, निजामुद्दीन (बाबा) मुजावर, वाजिद पठाण ,इब्राहिम बाबा शेख, समोयोद्दीन मशायक, कलीम कुरेशी, गयासोद्दीन शेख, काझी एजाज, अफरोज पीरजादे, शेख आयाज, शेख इस्माईल ,खालीद शेख, असद पठाण, मोहम्मद मुजावर, जाकीर खान पठाण, शेख मंजूर अब्दुलगणी, आहेमद हिराजी बागवान, मुजीब काझी, हबीब शेख, पठाण गुलमीर, शेख अब्दुल, शाहनवाज सय्यद, सय्यीद साबेर, सय्यद नादेरउल्ला, अँड मोहंमद उमर मोरवे, अँड एम शेख इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन दि 9 डिसेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक गौहर हसन यांच्याकडे देण्यात आले आहे.