नळदुर्ग (प्रतिनिधी)-  येणाऱ्या 12, 13 व 14 जानेवारी 2025 रोजी नळदुर्ग येथील मैलारपूर येथे श्री खंडोबा देवाची महायात्रा भरणार आहे. तरी या यात्रेनिमीत्त नगर पालिका व जिल्हा प्रशासनाने बोरी नदीचे व नदीघाटाची स्वच्छता करावी अशी मागणी भाविकांतून होत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशासह तेलंगाणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असणारे नळदुर्गचे श्री खंडोबा देवाची यात्रा येत्या 12, 13 व 14 जानेवारी रोजी भरत आहे, या यात्रेसाठी लाखो भाविक मैलारपूरात दाखल होत असतात. त्यामुळे यात्रेकरुना सोयी व सुविधा पूरविणे हे पालिकचे आणि जिल्हा प्रशासनाचे काम आहे, या ठिकाणी यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी दि. 13 जानेवारी रोजी मोठी यात्रा भरणार आहे, या यात्रेसाठी सुमारे पाच ते सात लाख भाविक याठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रेकरुना कोणत्याही सुविधा कमी पडू नये म्हणून पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन तयारीला लागणे गरजेचे आहे. या ठिकाणी पावणे दोन महीण्यासाठी देवाचे वास्तव्य असणार आहे, आणि देव या ठिकाणी नसताना ही भाविकांची गर्दीच असते त्यामुळे या तीर्थक्षेत्राला खुप महत्व प्राप्त झाले आहे, दरम्यान यात्रेच्या दिवशी या ठिकाणी महीला भाविक ओल्या कपडयाने दंडवत घेतात. त्यामुळे मंदीराच्या उत्तर बाजूस असलेल्या बोरी नदीच्या पात्राच्या काठावरची आणि नदी घाटाची स्वच्छता होणे अतिशय गरजेचे झाले आहे. कारण सध्या बोरी नदीच्या पात्रात मोठया प्रमणात पाणी आहे, आणि याच पाण्यामध्ये भाविक स्नान करीत असतात, या नदीमध्ये स्नान करणे पवित्र मानतात, त्यामुळे जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासन या बाबीकडे लक्ष घालून यात्रेच्या दिवशी भाविकांची गैर सोय होवू नये म्हणून नदी घाटाची स्वच्छता करावी अशी मागणी भाविकांतून होत आहे.


 
Top