तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील मध्यवर्ती प्राधिकरणामध्ये मंजूर असलेला पावणारा गणपती चौक ते हुतात्मा स्मारक रस्ता का होत नाही यासाठी काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आमदार राणा जगजितसह पाटील यांनी घेतलेल्या जनता दरबारच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिलेला हा आंदोलनाचा इशारा शहरात चर्चेचा विषय आहे

विधानसभा निवडणुकी पूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने या रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करून प्रशासनाची लक्ष वेधले होते, तरीही हा मंजूर असलेला रस्ता न झाल्यामुळे शहराची होणारी अडचण लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा या प्रश्नावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहराच्या विकासाच्या प्रश्नावर आमदार राहणार जगजीत सिंह पाटील यांना आम्ही नेहमी सहकार्य करू परंतु ठराविक लोकांच्या सूचनेप्रमाणे जर कारभार होत असेल तर आम्ही आंदोलन करून आवाज उठवू असा इशारा यानिमित्ताने काँग्रेस नेते ऋषिकेश मगर यांनी दिला आहे. आमदार पाटील यांनी या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी अन्यथा या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला गेला आहे.

विकास कामाच्या अनुषंगाने केली जाणारी प्रसिद्धी आणि फोटोसेशन म्हणजे विकास नाही नागरिकाच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी जमिनीवर लक्ष द्यावे विरोधी पक्षाला देखील विश्वासात घ्यावे सामान्य नागरिकांचे सूचना आणि सामाजिक संस्थांच्या सूचना देखील लक्षात घेऊन विकासाचा आराखडा राबवावा अशी अपेक्षा या आंदोलनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते ऋषिकेश मगर यांनी व्यक्त केली आहे. याप्रसंगी अमोल कुतवळ, नागनाथ भाजी, रणजीत इंगळे आदी उपस्थित होते.

 
Top