धाराशिव (प्रतिनिधी)-  खरेदी केलेल्या वस्तूवर पॉईट न दिल्यामुळे ग्राहकाने ग्राहक मंचाकडे दाद मागितली असता ग्राहक मंचाने मुक्ताई मार्टला 5 हजार रूपये मानसिक त्रासापोटी व 5 हजार रूपये तक्रारीचा खर्च या प्रमाणे 10 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. 

राहुल बाबुराव खटके यांनी श्री. मुक्ताई मार्ट प्रा. लि. या धाराशिव येथील दुकानातू खरेदी केलेल्या कपड्याच्या मालावर मुक्ताई प्रा. लि. यांनी पॉईट दिले नाही. म्हणून त्यांच्या विरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग धाराशिव येथे ॲड. देविदास वडगांवकर यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी आयोगाचे अध्यक्ष अमोल गिराम आणि सदस्य वैशाली बोराडे यांच्या समोर झाली. त्यावर आयोगाने तक्रारदार यांची तक्रार मंजुर करून श्री. मुक्ताई मार्ट प्रा. लि. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी 5 हजार रूपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रूपये द्यावेत असे आदेश दिले आहेत. या आदेशाची पुर्तता 45 दिवसात करणे आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मुक्ताई मार्ट यांनी ग्राहकांना सेवा देताना कशी त्रुटी केली याची चर्चा परिसरात होत आहे. या कामी ॲड. अविनाश मैदरकर यांनी सहकार्य केले. 

 
Top