भूम (प्रतिनिधी)- शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या 2025 चे दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, डोंबिवली विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, इतर उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे हे शिवसेना फुटीच्या नंतर धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून गेली एक ते दीड वर्ष पासून एक सच्चा शिवसैनिक आणि निष्ठावंत हुशार शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून सुनील काटमोरे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचले आहे. मातोश्री शी एकनिष्ठ असलेले धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी गेली अकरा वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशन करत आहेत. या दिनदर्शिकामध्ये पक्ष हिताचे केलेली कामे व इतर सामाजिक माहिती दिनदर्शिकेमध्ये दर्शवलेली आहे. दिनदर्शिका हे आकर्षक व जास्त प्रमाणात प्रकाशित केल्यामुळे प्रत्येक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोच होत आहे. एकजुटीने राहा, जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल या ब्रीद वाक्याचे दिनदर्शिका प्रकाशन केले आहे.