तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर पासुन अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काञी कामठा वनक्षेञात बिबट्याचे आगमन झाल्याचे काञी, कामठा येथे दोन वासराचा पाडलेल्या फडशा वरुन दिसुन येत आहे. या पुढे जंगल क्षेत्र संपुन मानव क्षेञ चालु होणार असल्याने या बिबट्याला पकडणे गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग पूर्णपणे सतर्क मोडवर आलेला आहे. या भागात वाघ पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. दिवसाची आणि रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाताना बँटरी, काटी व सोबत एखाद्याला घेऊन जावे. अशी माहिती वनपाल मधुकर घोरपडे यांनी दिली.
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा काञी, कामठा या परिसरात वनक्षेत्र जे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्या या भागात येवुन मुक्काम स्थिर केलाचे दिसत आहे. वन विभागाने निरीक्षणे नोंदवत म्हणजे बिबट्या कुठल्या मार्गाने आला, त्याचे ठसे आढळून येतात का, तसेच कुठे त्याची विष्ठा दिसून येते का यावर माग काढणे गरजेचे आहे. सध्या ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे. काञी येथे शेतकरी सचिन देशमुख गायी वासरे बांधुन गावात आले. परत जातो तो वासराचा फडशा पाडल्याचे दिसुन आले. या दोन्ही घटना वनक्षेत्राचा जवळ असल्याने बिबट्या शिकार करुन परत वनक्षेञात जात असण्याची शक्यता आहे. या भागात दोनशे एकर आसपास वनक्षेञ आहे. त्यात शोध घेणे वनखात्याला आवानात्मक काम आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असून, आतापर्यंत दोन वासरांना ठार केलेले आहे.
बिबट्याच्या वावरामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच सध्या शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री, अपरात्री शेताकडे जात असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करावी, अशा मागणी होत आहे. यासाठी खुद्द वनमंत्री गणेश नाईक यांनी येथे भेट द्यावी अशी मागणी होत आहे. येथे बिबट्या कुठुन कसा इतक्या अंतरावरून आला. येताना कुणालाच दिसला नाही कसा ? विशेष म्हणजे बिबट्याने दोन्ही शिकार राञी केल्या आहेत. वाघाला पाहिले म्हणणारा एकाही व्यक्ती पुढे येत नाही. या बिबट्या वावर बाबतीत हिंस् प्राणी असले तरी ते माणसांना घाबरून असतात. पण वेळ पडल्यास ते हल्ल करतात. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता काळजी घ्यायला हवी.
नागरिकांनी रात्री एकट्याने न फिरता समूहाने फिरावे. शेती व झाडी असलेल्या ठिकाणी आवाज करत जावे. वाघ देखील माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मोठ्याने आवाज करावा. शक्यतो जवळ टॉर्च ठेवावी. रात्री तिचा वापर करावा. प्रकाश दिसला की, वाघ दूर जातो. यासोबतच मोठ्याने गाणे लावावे, गाणे गात जाणे आदी काळजी घेण्याची गरज आहे. शेतात गेल्यानंतर खाली न बसता उभे राहावे. महावितरणने रात्री शेतातील फक्त सिंगल फेज वीजपुरवठा सुरु ठेवावा. शेताला पाणी देण्यासाठी थ्री फेज वीजपुरवठा फक्त दिवसाच द्यावा. यामुळे शेतकरी दिवसाच शेतात काम करतील. तसेच नागरिकांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये. ही काळजी घेणे गरजेचे आहे.