तुळजापूर (प्रतिनिधी)- माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतने धनंजय सावंत व केशव सावंत यांना पत्राव्दवारे धमकी देणाऱ्या माफीयाला तात्काळ अटक करुन तपास एसआयटीकडे हे प्रकरण देण्याची मागणी शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख बापुसाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देवुन केली.
असे निवेदन शहर अध्यक्ष बापुसाहेब भासले यांच्या नेतृत्वाखाली सुरेश नेपते, अभय सांळुके, लाला तांबोळी, मोहन भोसले, दिनेश भोसले, पांडुरंग पलंगे, मनोज कोकणे, दिनेश कापसे, ओंकार क-हाडे, अकुंश पवार, गणेश म्हेञे, महादेव जमदाडे, गणेश गंधोरे, प्रकाश कांबळे, अंबादास कदम, संतोष शिंदे, सचिन मेटे यांच्या स्वाक्षरी या निवेदनावर आहेत.