परंडा (प्रतिनिधी)- शासनामार्फत परंडा तालुक्यात मुग, उडीद व इतर कडधान्ये पिकांची हमीभाव केंद्र चालू करण्यात आली असून त्यामध्ये तूर पिकाचा सामावेश केला नाही. चालू वर्षी परंडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तूर पिकाचे उत्पन्न घेतले आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची तूर शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

शासनाने तात्काळ शासनमान्य तूर हमीभाव केंद्र चालू करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला यासाठी भाजपा परंडा च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. झहीर चौधरी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शिवाजी पाटील, सरचिटणीस धनाजी गायकवाड, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भालचंद्र औसरे, परसराम कोळी, साहेबराव पाडुळे, धनंजय काळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top