मुरूम (प्रतिनिधी)- नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुरूम नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार बापूराव पाटील निवडणूक मैदानात उतरले आहेत. मुरूम भाजप प्रचारात संपदा शरण पाटील, श्वेताताई बापूराव पाटील यांचे डोर टू डोर झंझावती प्रचार सुरु आहे. दि. 27 रोजी मुरूम येथील प्रभाग 1 मधील सिद्धयप्पा मंदिरातील शिवलिंग पूजनाने डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाला. याप्रसंगी असंख्य महिला भगिनाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रचारात दरम्यान मिळत आहे.
