धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात 13 डिसेंबर 2024 रोजी भर दुपारी निरामय हॉस्पिटलच्या समोर मागील भांडण्याच्या कारणावरून लाथा बुक्क्या, रॉड, चाकू, कत्तीने मारहाण करून एकास गंभीर जखमी केले आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजदूत शिवाजीराव आडे रा. पिवळी टाकीजवळ उंबरे कोटा धाराशिव यास मागील भांडण्याच्या कारणावरून अनिकेत तुकाराम जाधव याने गैर कायद्याची मंडळी जमवून आडे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी, रॉड, चाकू, कत्तीने जबर मारहाण करण्यात आली. यावेळेस राजदूत आडे यांचे नातेवाईक त्यांना वाचविण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करून कत्तीने व रॉड ने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकाराची फिर्याद राजदूत आडे यांनी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.