तेर (प्रतिनिधी )बायफ बीआयएसएलडी व बीएसएस मायक्रोफायनान्स लि. यांच्या संयुक्त विद्यमानातुन व पशुसंवर्धन विभागयांच्या मार्गदर्शनाखाली गुफांवाडी येथे 16 गायी व म्हशींची वंद्धत्वची तपासणी करण्यात आली. यामध्ये जंतनाशक, गोचीड निर्मूलन तसेच गाभण जनावरांची तपासणी , खरकुत आजाराचे व 60 शेळ्या मध्ये पिपिआरचे लसिकरण करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये सर्व पशुंना मोफत उपचार देण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र वाघमारे (पशुधन विकास अधिकारी मुरुड) यांनी पशुपालकांना मार्गदर्शन व जनावराची तपासणी केली. गावातील पशुपालकांना सॉर्टेड सिमेन , पारंपारीक सिमेन, चारा बियाणे, मिनरल मिक्स्चर हे बीएसएस माक्रो फाईनान्स ली . याच्या सामाजिक जबाबदरीतून त्यांच्या अर्थसाह्याने पशूपालकांना सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहे तरी यांचा पशूपालकांनी लाभ घेण्याचे अहवान बायफ संस्थे डॉ. एकशिंगे संतोष यांनीआले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी लाभांच्या योजना व त्या बाबतही माहिती सांगण्यात आली. पशुपालकांचे जनावर गाभण न जाण्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी अशाप्रकारे वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले या मध्ये बायफ संस्थे मार्फत व पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत सर्व औषध उपचार व खनिज मिश्रण, लसिकरण पशूपालकांना मोफत देण्यात आले. या कार्यक्रमास बायफचे कर्मचारी डॉ. अतूल मुळे, आदेश चव्हाण, कृत्रीम रेतन तंत्रज्ञ व पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमास पशुपालकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.