वाशी (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी विद्यालय,वाशी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकुमार शितोळे खजिनदार श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजाभाऊ टेकाळे प्राचार्य बी.जी.पी.एस. महिला बी.एड. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, सोमनाथ घोलप गटशिक्षणाधिकारी गटशिक्षण कार्यालय वाशी, विजयाताई गायकवाड नगराध्यक्ष नगरपंचायत वाशी, सुरेश कवडे उपनगराध्यक्ष नगरपंचायत वाशी, अमर चेडे, पोलिस उपनिरीक्षक विनोबा भावे नगर पोलिस स्टेशन कुर्ला मुंबई,तानाजी शिनगारे चेअरमन शालेय समिती,प्राचार्य डॉ.अरुण गंभीरे व मुख्याध्यापक संतोष माने उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या कार्यक्रमात वाशी गावातील व परिसरातील विविध शिक्षणप्रेमी व दानशूर व्यक्तींनी रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात आलेली पारितोषिके गुणवंत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयातील प्रथम क्रमांक प्राप्त मोराळे प्रेमराज लक्ष्मण- (99.40% गुण ) या विद्यार्थ्याला एकूण पारितोषिक रक्कम रुपये 14750 ,एक सायकल, एक पुस्तक व सन्मान चिन्ह इ.पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.द्वितीय क्रमांक प्राप्त व विद्यालयातून मुलीतून प्रथम फारणे अनुजा शशिकांत (98.20% गुण)या विद्यार्थिनीला एकूण पारितोषिक रुपये 10697 ,दोन पुस्तक,एक सन्मानचिन्ह इ.पारितोषिके वितरण करण्यात आली.तसेच  द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी अथर्व उमेश चेडे (98.20% गुण) या विद्यार्थ्याला 3040 रुपये, पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी कवडे मदुरा जयंत (98.00% गुण) या विद्यार्थिनीला एकूण पारितोषिक रुपये 5430 पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर एस.एस.सी. परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना डॉ बी.वाय.यादव, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या वतीने रोख पारितोषिक  देऊन सन्मानीत करण्यात आले. 

याचबरोबर पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा,नवोदय प्रवेश परीक्षा व एन. एम. एम. एस.परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. 

सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. गाढवे,पर्यवेक्षक बी.एम. सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी  संदीप कवडे,उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, नेताजी नलवडे,उपाध्यक्ष शिक्षक -पालक संघ यांचे सहकार्य लाभले. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धारकर एस. एस.,देशमुख जी. एम.,वाघेरे ए. बी.यांनी तर आभार पर्यवेक्षक बी.एम.सावंत  यांनी मानले.

 
Top