कळंब (प्रतिनिधी)-  येथील महावितरण कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वयक नसल्यामुळे ग्राहकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  शहरांमध्ये काही भागात रीडिंग न घेताच बिले आवाची सव्वा दिले जातात. तर दिलेली बिले त्या ग्राहकापर्यंत पोहोचत नसल्यामुळे अनेक ग्राहक बिल भरण्यापासून वंचित राहतात. त्यांना थेट महावितरण वीज पुरवठा खंडित करण्याची धमकीच देत असल्यामुळे ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वीज बिल वेळेवर घरपोच देत नसल्याची तक्रार कळंब शहरातील डी. पी. नंबर दोन वरचे ग्राहक रामलिंग निवृत्ती माळी यांनी उपविभागीय अधिकारी यांना थेट तक्रार दिली आहे. रामलिंग माळी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मला तब्बल फेब्रुवारी पासून एक ही लाईट बिल मिळालेले नाही. त्याचप्रमाणे माझ्या मीटर वरची रीडिंग सुद्धा वेळेवर घेतली जात नाही. त्यामुळे मला अवाचे सव्वा बिल आकारणी करून वीज कनेक्शन तोडण्याची धमकी महावितरणाचे कर्मचारी  देत आहेत. संबंधित अधिकाऱ्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही अधिकारी माझ्या तक्रारीची दखल घेत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या 26 जानेवारी पासून मी वीज वितरण कार्यालय समोर अमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी निवेदनात दिला आहे. या निवेदनामुळे असे स्पष्ट होत आहे की कळंबच्या महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वयेच नाही. त्यामुळे असे वारंवार प्रकार घडत असतात तर लाईट बिलाचा विषय नेहमी चर्चेचा ठरत आहे.  आवाची सव्वा आकारणी करून अनेक ग्राहकांना महावितरण नेहमीच वेटीस धरत आहे.  

 
Top