तुळजापूर -  चांगल्या  शिक्षणासाठी बाहेर गावी जाणाऱ्या  विध्यार्थांन पैकी अवघे पाच टक्के विध्यार्थी यशस्वी होतात ,पंचानव टक्के परत तुळजापूरात येत असल्याने येथे उच्च दर्चाचे चांगले शिक्षण मिळण्यासाठी येथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे तुळजापूरच्या शैक्षणिक उज्वल भविष्यासाठी गरजेचे असल्याचा सुर आम्ही तुळजापूरकर शिक्षणासाठी एक पाऊल पुढे अभिनव,उपक्रम कार्यक्रमात निघाला.  तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे, आम्ही तुळजापूरकर... शिक्षणासाठी एक पाऊल पुढे या अभिनव उपक्रमाचे प्रारंभा श्रीतुळजाभवानी सरस्वती प्रतिमा पुजनृ , संस्था प्रार्थनेने झाला 



, यावेळी आपले मनोगत व्यक्त  करताना अनेक मान्यवर म्हणाले कि  तिर्थक्षेञ तुळजापूर चे नाव  श्रीतुळजाभवानी  मुळे देशाचा नकाशावर आहे तसेच शैक्षणिक मध्ये असणे गरजेचे आहे. पण येथील शैक्षणिक क्षेञाची दुरावस्था झाली आहे. 

 तुळजापूर तालुक्यातील विद्यार्थी गुणवत्ताधारक व होतकरू आहे पण येथे त्याला शिक्षण अपेक्षित मिळत नाही  ,त्याची व्यापकता समाजाने समजून घेणे गरजेचे आहे,जर आपले विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जात असतील तर आपण ही कुठेतरी यासाठी जबाबदार आहोत याची जाणीव आपणांस गरजेची आहे ही बाब आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे यासाठीच या अभिनव उपक्रमाचे आयोजन  करणे काळाची गरज आहे. शिक्षण यशाची गुरुकिल्ली आहे हे ओळखून शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय चारित्र्याचे नागरिक घडणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


यावेळी पालक संवाद सत्रामध्ये महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण, शाळा बहाय मुलांना शिक्षण देणे, बालकांसाठी मैदान उपलब्ध करून देणे, बदलत्या जीवनशैलीच्या पध्दतीने शैक्षणिक सुविधा निर्माण करणे, नवीन लोकांचे गेस्ट लेक्चर्स आयोजित करणे, भविष्यात मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज स्थापन करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे, कॉपी मुक्त परीक्षा घेणे, विज्ञान शाखा सुरु करणे,नाईट कॉलेज सुरू करणे, व्यसनमुक्ती साठी प्रयत्न करणे, स्पर्धा परीक्षा तयारी साठी पुस्तके आणि अभ्यासिका उपलब्ध करून देणे या बाबी समोर ठेवून एक शैक्षणिक आराखडा तयार करण्यात यावा अशा आवश्यक मागण्या पालकांच्या आणि उपस्थितांच्या माध्यमातून मांडण्यात आल्या.एक शैक्षणिक देवकार्य करण्याचा मानस तुळजापूर वासियांनी यावेळी व्यक्त केला.


येथील शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी आम्ही इंग्लीश स्कुल सायन्स शाखा बीएससी  यशवंतराव  चव्हाण  मुक्त  विध्यापीठ अंतर्गत विविध कोर्स चालु करण्यात येणार आहे.तसेच सेट नेट परिक्षा तयारी साठी कोठा तामीळनाडू येथे तज्ञ प्राध्यापक येथे पाचारण करण्याचा आमचा मानस आहे यापुढे येथील शैक्षणिक  क्रीम बाहेर न जाता येथेच राहावे पालकांचा पैसा वेळ वाचावा मुलगा आपल्या समोर राहावा असे आम्ही नियोजन करणार आहे असे शेवटी आयोजक प्राचार्य जीवन पवार यांनी समारोप प्रसंगी केले


सदर प्रसंगी अशोक मगर,सज्जनराव साळुंके, सदस्य महाविद्यालय विकास समिती यांच्या सह माजी प्राध्यापक विलास जगदाळे, नागनाथ भांजी ,उत्तम अमृतराव,म्हेत्रे,उळेकर, अनिल रोचकरी,ऍड.किरण कुलकर्णी,प्रा.विवेक गंगणे,प्रा एकदंते,अमोल कुतवळ,महेश चोपदार,आनंद कंदले,ऋषी मगर,प्रा विवेक कोरे  त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व नागरीक उपस्थित होते. कार्यमासाठी डॉ आनंद मुळे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बाबर यांनी तर आभार प्रा धनंजय लोंढे यांनी मानले, राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली .

 
Top