धाराशिव (प्रतिनिधी)- प्रबोधन युवाशक्ती महाराष्ट्र आयोजित, प्रबोधन परिषद 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा पुणे येथील सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये भारतीय कामगार सेनेचे नेते डॉ. रघुनाथ कुचिक, जेष्ठ पत्रकार महेशजी म्हात्रे व ब्रम्हकुमारी मीरादीदी यांचे हस्ते शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालय प्रा. सोमनाथ लांडगे यांनी प्रवेश मिळवून दिलेले आहेत. या योगदानाबद्दल श्री साई श्रध्दा एज्युकेशनचे संचालक सोमनाथ लांडगे, संचालक सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याला सचिन पाटील शुभम दिघे विनोद सूर्यवंशी, तेजस गुडसूंद, महारूद्र जाधव, प्रा. देवीदास बिनवडे, उमेश सांळुंखे व पुणे व परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यानंतर प्रा. सोमनाथ लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा माझा किंवा श्री साई श्रध्दा एज्युकेशनचा सन्मान नाही, तर आपण पाच वर्षात नव-नवीन प्रयोग करून अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यात यशस्वी झालो आहोत, त्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा हा सन्मान आहे. प्रथम वर्षात आपण आमच्या ऋषिकेश सोमनाथ लांडगे सहित तीन मुलांना मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून दिला. या प्रथम वर्षात आपण कोणत्याच विद्यार्थ्यांकडून कसलीच फीस घेतली नव्हती.
दुसऱ्याच वर्षात आपण आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयत्न करण्यास सुरुवात करत अत्यंत अल्प फीस मध्ये 74 मुलांना मेडिकल कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळवून दिला. तिसऱ्या वर्षात आपण आपल्या टेस्ट सिरीजचा विस्तार करण्यास सुरुवात केली व ही संख्या 92 करण्यात यशस्वी झालो. आता चौथ्या वर्षात आपण नीट ऑनलाइन टेस्ट सिरीजची सुविधा 16 जिल्ह्य़ात उपलब्ध करून देऊन नवीन तीन जिल्ह्य़ात सर्वाधिक प्रयत्न करत आहोत. ते तीन जिल्हे परभणी, हिंगोली व नंदुरबार आपण विस्तारित करण्यास सुरुवात केलेली आहे. आता विस्तारित होत असताना हडपसर पुणे व नाशिक येथे दोन नवीन शाखांमध्ये सुध्दा मदत उपलब्ध होणार असून, सेवा क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. या वर्षात आता सर्व राऊंड संपले असून खूप कठीण निकाल लागून देखील आपण 119 मुलामुलींचे प्रवेश मेडिकल कॉलेजेस मध्ये करून देण्यात यशस्वी झालो आहोत. आता या शैक्षणिक वर्षात 200 विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. हा सर्व होत असलेला मानसन्मान हा विद्यार्थी व पालकांकडून आम्हांला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने होत आहे. याचा आम्हास अभिमान आहेच पण हा सन्मान आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना व पालकांनाच समर्पित करत आहोत. असेच आपले सहकार्य आम्हास पुढे भविष्यात देखील लाभत राहिल या अपेक्षा निश्चितच आम्हास आहेत अशी अपेक्षा प्रा. सोमनाथ लांडगे, संचालक श्री साई श्रध्दा एज्युकेशन धाराशिव यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.