मुरूम (प्रतिनीधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील उमरगा येथील कॅडेट रावण ममाळे (सीआयएसएफ ) माजी विद्यार्थी संदिप कुंभार (आयटीबीपी ), नवनाथ पाश्मे ( सीआरपीएफ) यांचे स्पर्धा परीक्षा पोलीस, सैन्यदल ॲकडमी, करिअर कट्टा, विभागा तर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षिय भाषणात कॅडेटसना,विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सरांनी आपल्या भाषणात सांगितले की केवळ सैन्यदल, पोलीस, निमलष्करी पदावर भरती झाल्या नंतर न थांबता एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन वर्ग एक (क्लासवन ), वर्ग दोन (क्लासटु 'ची तयारी करावी असे सांगितले या साठी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, करिअर कट्टा , सैन्य -पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण जे की लेखी परीक्षेची तयारी करूण घेते व एनसीसी च्या माध्यमातून मैदानाची तयारी करूण घेते. या साठी विद्यार्थ्यानी याचा लाभ घेऊन देशाची सेवा करावी असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी उप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ पदमाकर पिटले, कॅप्टन ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, उपस्थित होते . सूत्रसंचलन डॉ चंद्रसेन करे आणि आभार डॉ. समाधान पसरकले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कॅडेटस, विद्यार्थी, कर्मचारी बहुसंखेने उपस्थित होते.