तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ अँड. गुणरत्न सदावर्ते बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी दुपारी आले असता यांच्या समोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अँड. सदावर्तेच्या धिकाराचा प्रचंड घोषणाबाजी करीत त्यांच्या अंगावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना विरोध केला.
यावेळी बाँऊन्सर सह प्रचंड पोलिस बंदोबस्तात ॲड. सदावर्ते गुणरत्न गुपचुप आले असताना भवानी रोडवर असलेल्या मराठा समाजाचा तरुणांनी ते दिसताच त्यांचा धिक्काराचा घोषणा दिला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवल्याने पुढील अनर्थ राडा टळला. नंतर आपल्या बाँऊन्सर व पोलिस बंदोबस्तात मंदिरात जावुन प्रचंड बंदोबस्तात व तणावपुर्ण वातावरणात दर्शन घेऊन गेले.
या घटने बाबतीत बोलताना मराठा आंदोलक अर्जुन सांळुके म्हणाले कि, ॲड. सदावर्ते गुणरत्न हे मराठा आरक्षण विरोधक असून, यांनी मराठ्यांना मिळालेले सोळा टक्के आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षण न मिळाल्याने 350 तरुणांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्याला ॲड. सदावर्ते गुणरत्न हे जबाबदार असल्याचा आरोप केला.