धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील पोदार स्कूलमधील शिक्षक हैदर अली शेख यांच्यावर सहशिक्षिकेवर अत्याचाराचा गुन्हा आनंदनगर पोलिस ठाण्यात नोंद आहे. त्या गुन्ह्याच्या तपासात हैदर अली यांना मदत केल्याचा ठपका ठेचत पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांना निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी शनिवारी दि. 7 डिसेंबर रोजी केली आहे. 

शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षक हैदर अली शेख यांनी सहशिक्षिकेस एअर लीडर बनविण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिस कोठडी मागणे अपेक्षित असताना जांभळे यांनी रिमांडमध्ये न्यायालीन कोठडी मागितली. जप्ती पंचनामा करताना व्हिडिओग्राफी करणे अनिवार्य असतानाही ती केली नाही. गुन्ह्याशी संबंधित पीडिता व आरोपी कार्यरत असलेल्या शाळेतील व लॉजवरील साक्षीदार यांचे जबाब घेतले नाहीत. गुन्हा नोंद झाल्यानंतर 24 तासात घटनास्थळ पंचनामा केला नाही. यासह अन्य ठपका ठेवला आहे. जांभळे यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी त्यांचे निलंबन केले आहे. 

 
Top