कळंब (प्रतिनिधी)- होमिओपॅथी डॉक्टरांना आलोपॅथीची औषधे लिहून देण्याची परवानगी अन्न व औषधे (एफ डी ए)  प्रशासनाने जाहीर केल्यामुळे आलोपॅथी डॉक्टरांनी त्याला कडाडून विरोध केला असुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. एफडीए च्या निर्णयाविरुद्ध लवकरच आय एमए कोर्टात दाद मागणार आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, केवळ एक वर्षाचा फॉर्माकॉलॉजीचा कोर्स करून कोणताही डॉक्टर आलोपॅथीची प्रॅक्टिस करूच शकत नाही. त्याला त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान अवगत असने खूप आवश्यक असते. निरनिराळ्या औषधांच्या मात्रा, त्यांचे फायदे-तोटे, ड्रग्ज रियॅक्शन्स, इत्यादीची ईतंभुत माहिती असावी लागते. केवळ एक वर्ष कोर्स करून अर्धवट राव निर्माण होतील आणि जनतेच्या आरोग्याशी खेळतील व त्याची किंमत जनतेस मोजावी लागणार हे मात्र नक्की.  


आय एम ए कोणत्याही पॅथी विरोधात नसुन सर्व पॅथिचा सन्मान करते.  ज्याने ज्या पॅथिचे शिक्षण घेतले त्यांने त्या त्या पॅथिची प्रॅक्टिस करावी. त्यामध्ये संशोधन करावे अशी आयएमएची भूमिका राहिलेली आहे. केवळ एक वर्षाचा कोर्स करून सक्षम डॉक्टर बनूच शकत नाही. असे केल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. क्रॉसपॅथिचे प्रकरण न्यायप्रविष्ट असुन एफडीए च्या निर्णयाविरूद्ध आयएमए कोर्टात दाद मागणार आहे. 

-डॉ. रामकृष्ण लोंढे 

माजी अध्यक्ष, आय एम ए महाराष्ट्र राज्य.

 
Top