तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या पवनचक्कीच्या खाजगी टॉवर लाईन बाधीत शेतीमालकांना नियमानुसार कमी रक्कम देवुन शेतकऱ्यांचे अर्थीक नुकसान केल्याने त्यांना योग्य मोबदला द्यावा. अन्यथा टाँवर लाईन बाधीत अन्यायग्रस्त शेतकरी आंदोलन करतील असा इशारा बाधीत शेतकऱ्यांसह राकाँ तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी पञकार परिषद घेऊन दिला.
या बाबतीत बोलताना पुढे म्हणाले की, रिन्यु पावर कंपनीने गोरगरीब शेतकऱ्यांना वेठीस धरु नये. आम्ही शेतकऱ्यांना टॉवर उभा करताना 15 लाख देतो म्हणुन कसलीही संमती न घेता विरोध बळपुर्वक डावलुन नादाला लाऊन प्रत्यक्षात 2 लाखात टावर काम कंम्पलीट करुन फसवणुक करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. तसेच टावरलाईन मधील दलाल, एजंट, पवनचक्की टावर, भु माफीया लोकांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा. असे शेवटी सुर्यवंशी म्हणाले. यावेळी बाधीत शेतकरी उपस्थितीत होते.