भूम (प्रतिनिधी)-   भूम तालुक्यातील रामेश्वर व उळूप  शिवारात दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता राहुल महादेव दराडे या शेतकऱ्याच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. यामुळे रामेश्वर शिवारात बिबट्याचे दहशतीचे वातावरण पसरले आहे. मागील महिन्यापासून भूम तालुक्यात बिबट्या सर्वत्र फिरत आहे. वनविभागाने लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावे, असे मागणी भूम तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.

मागील दहा-बारा दिवसात मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने शोध मोहीम हाती घेतली परंतु बिबट्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. रामेश्वर येथील शेळीला बिबट्याने ठार मारल्यानंतर वन विभागाने या शेळीला कॅमेरा बसवला असून त्याच्या माध्यमातून बिबट्या पुन्हा त्या शेळीकडे येईल असे वनविभागाचे म्हणणे आहे. परंतु वनविभागाच्या हातात अद्यापही बिबट्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नसून, बिबट्या मात्र मुक्या जनावरांची भूम तालुक्यातील परिसरात शिकार करत आहे. 

 
Top