तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील काक्रंबा येथील श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येथे श्रींच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा  मार्गशिष शुध्द 5 शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी  विविध धार्मिक कार्यक्रम होवुन संपन्न झाला.

तत्पुर्वी बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पुजा विधीस आरंभ झाला. राञी धनगर ओव्या कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवारी दि. 5 डिसेंबर रोजी काक्रंबा गावातुन खंडोबा मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नंतर राञी वाघ्या-मुरुळी कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी (दि.6) मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा विधीवत संपन्न झाला. रविवारी (दि.8) महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. श्री खंडोबा मुर्ती  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संखेने  सहभागी झाले होते. या सोहळा यशस्वीतेसाठी  काक्रंबा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 
Top