भूम (प्रतिनिधी)- आपल्या इतिहासाचा वारसा प्रेरणा निर्माण करणार आहे. व्याख्यानमालेसाठी पुण्यामध्ये सुद्धा एवढी गर्दी जमत नाही. तेवढी गर्दी आज भूम शहरातील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये जमलेली आहे. सोशल मीडिया व मोबाईलमुळे नागरिकांमध्ये आपुलकी, माणुसकी, प्रेम, सुसंवाद संपत चाललेला आहे. मोबाईलचा अतिवापर होत चालला असून एक तास मोबाईल शिवाय राहू शकत नाही. यामुळे काही जणांना मानसोपचार तज्ञाकडे जावे. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. असे प्रतिपादन इतिहास तज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
आलमप्रभू व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी इतिहासातून काय शिकावे ? या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करताना इतिहास परिवर्तनासाठी असतो.
प्रख्यांत गायक सुरमणी धनंजय जोशी यांनी विविध संताच्या रचना सादरकरत भूम येथील अभंग नाट्यरंग कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले. आलमप्रभू व्याख्यानमालेच्या निमित्ताने व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात कँप्टन अजय मनसुके यांच्या वतीन सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. “अवघे गर्जे पंढरपुर चालला नामाचा गजर “ हा अभंग सादर करत कार्यक्रमाची सांगता केली त्यांना तबला साथ प्रशांत गाजरे संवादिनी हरीश कुलकर्णी पखवाज अमोल लाकडे यांनी केली या संगीत मैफिलीसाठी धाराशीव बार्शी तेरखेडा वाशी व भूम शहर व परिसरातील श्रोते मोठ्या संखेत उपस्थित होते. सुत्रसंचलन ए. पी. देशपांडे यांनी केले. आलम प्रभू व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. मागील तीन दिवसापासून भूम येथील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आलम प्रभू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते .आलम प्रभू व्याख्यानमालेचे हे 13 वे वर्ष आहे. दरवर्षी कॅप्टन अजय मनसुके या व्याख्यानमालाचे आयोजन करत असतात.