तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर येथे चंपाष्टी पुर्वसंध्येला शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी सांयकाळी देव्हा-यात बाजरी, गहु कणीक, पेढा, बर्फीसह अन्य पदार्थांचे दिवे करुन त्याचे पुजन करुन नागदिवे पुजन सोहळा संपन्न पारंपरिक पध्दतीने संपन्न झाला. आपल्या घरात धनधान्य विपुल यावे, यासाठी नागदिवे पुजा केली जाते. 

आज बाजरी, कणीक, पुरण, पेढा, बर्फी याचे दिवे व हरभरा भाजी याचा नैवध दाखवुन दिव्यात तुपाचा वाती प्रज्वलित करुन नागदिव्याचे पुजन केले गेले. या वातीवरील काजळी धरुन त्यात तुप टाकुन याचे काजळ केले जाते. ते डोळ्यात घातले कि डोळ्याचे विकार होत नाहीत अशी आख्यायिका सांगितले जाते. मुल जन्मला आले की त्याचा नावाने दिवा करुन त्याचे पुजन करण्याची प्रथा परंपरा ती आजही पाळले जाते.


 
Top