भूम (प्रतिनिधी)- 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय भूम येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस महसूल अधिकारी राहुल जिकरे यांनी पुष्पहार अर्पण करून केली. 

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य अजित बागडे, जिल्हा सहसचिव तथा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य  आशिष बाबर हे ग्राहक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आशिष बाबर यांनी आभासी सुनावणी आणि ग्राहक न्यायासाठी डिजिटल प्रवेश या विषयावर मार्गदर्शन केले. ग्राहकांनी ऑनलाईन तक्रार कशी नोंदवावी व त्याचा पाठपुरावा करून तक्रारींचे निवारण कसे करावे यासंदर्भात अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. अजित बागडे यांनी ग्राहक संरक्षण कायदा व दैनंदिन जीवनात ग्राहकांनी आपली फसवणूक कशी टाळता येईल याविषयी मार्गदर्शन केले. महसूल सेवक अस्लम शेखदार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.  तर सहाय्यक महसूल अधिकारी हरिश्चंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सहायक महसूल हरिश्चंद्र पवार, पुरवठा निरीक्षक रेश्मा कदम, सहायक महसूल अधिकारी राहुल जिकरे, महसूल सेवक अस्लम शेखदार, तांत्रिक सहायक एजाज मुजावर, रास्त भाव दुकानदार व ग्राहक वर्ग उपस्थित होते.


 
Top