धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचा समर्थ देशमुख यांनी रायगड जिल्हा परिषद उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या  शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राने व रसायनशास्त्र विभागातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी समर्थ देशमुख या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केले होते. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी समर्थ देशमुख यांचे कौतुक केले. समर्थ देशमुख यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप देशमुख,डॉ. मंगेश भोसले, स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख डॉ. मारुती लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top